Type Here to Get Search Results !

Ads

National Science Day Quiz Competition Certificate

राष्ट्रीय विज्ञान दिन :

प्रश्नमंजुषा स्पर्धा 2025

National Science Day of india
National Science Day 2025

ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा

विज्ञान दिवस
राष्ट्रीय विज्ञान दिन 2024 ची थीम ' विक्षित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान ' आहे. इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या. भारतात दरवर्षी दिनांक २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो

दहा पैकी दहा मार्क मिळवणाऱ्या स्पर्धकांना मिळेल ई-मेलद्वारे आकर्षक प्रमाणपत्र
त्यामुळे आधी व्हिडिओ नीट पहा आणि मगच प्रश्नमंजुषा सोडवा.


राष्ट्रीय विज्ञान दिन : प्रश्नमंजुषा स्पर्धा

 

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक सदिच्छा!

विज्ञान सांगतं - 

 विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं 

 ते कारण आपल्या मानवी बुद्धीला समजू शकतं 

सर्व कारणं आजच समजतील असं नाही पण जेव्हा केव्हा समजतील त्यावेळी विज्ञानाच्या नियमानेच समजतील.

ही कारणं समजल्यावर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या विकासासाठी, काही समस्या दूर करण्यासाठी करून घेता येतो.

 हजारो वर्षे अनुत्तरित असणारे प्रश्न आधुनिक विज्ञानाने सोडवले आहेत. 

 याचा अर्थ सर्वच प्रश्न सुटले आहेत असे नाही पण आज अनुत्तरित असणारे प्रश्न ही विज्ञानाच्या आधारेच सोडवता येणार आहेत. 

 विज्ञान स्वतः काही चागलं किंवा वाईट ठरवत नाही. विज्ञान जे आहे ते, जसं आहे तसं आपल्यासमोर मांडतं.

 शाळा महाविद्यालयांतून निबंध, भाषण स्पर्धेसाठी दिला जाणारा विज्ञान शाप की वरदान हा विषयच चूक आहे. विज्ञान हे वरदानच आहे. ते कधीच शाप असू शकत नाही. 

 विज्ञान वापरणाऱ्याच्या विवेकावर आपण विज्ञानाला शाप किंवा वरदान ठरवत असतो. शाप किंवा वरदान हा विज्ञानाचा गुण नसून वापरणाऱ्याचा आहे.

 विज्ञान संपल्यावर अध्यात्म सुरू होते ही समाजाने जोपासलेली एक गोंडस अंधश्रद्धा आहे. उलट जिथे अध्यात्म थांबतं तिथून विज्ञान सुरू होतं असं म्हणता येऊ शकतं.

 विज्ञान हे अध्यात्माप्रमाणे मला सर्व समजतं किंवा समजलेलं आहे असं म्हणत नाही. 

 आजपर्यंतच्या ज्ञानाच्या आधारे मला एवढं समजलेला आहे असं विज्ञान म्हणतं. अजून न समजलेल्या अनेक गोष्टी आहेत हे विज्ञान नम्रपणे मान्य करतं. 

 न समजलेल्या गोष्टी समजून घेण्यासाठी विज्ञान नेहमी नवनवीन ज्ञानाच्या शोधात असतं. 

 विज्ञान आपल्याला निर्भय, समग्र आणि व्यापक विचार करायला शिकवतं. 

निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग हे विज्ञानाचे सत्य शोधण्याचे मार्ग आहेत.

 अलीकडे विज्ञानाचा वापर करून अज्ञान आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे (फलज्योतिष, वास्तुज्योतिष वगैरे वगैरे) प्रकार सुरू आहेत त्यापासून सावध राहिलं पाहिजे.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक सदिच्छा!

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

What's Up Group Join 

Post a Comment

11 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area